'श्री'चे विसर्जन आपल्या दारी उपक्रमाला उदंड प्रतिसाद; दिड हजार गणेश मूर्तीचे संकलन

करण ससाणेंच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम
साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या वतीने उपनगराध्यक्ष तथा युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली  श्रीं चे विसर्जन आपल्या दारी या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शहरातील जवळपास दिड हजार गणेश मूर्ती संकलन झाल्या आहेत.

          कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी जवळपास १० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सदर वाहनद्वारे घरगूती गणेश मूर्ती संकलन करून प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहे त्यामुळे संभाव्य होणारी गर्दी टळली आहे.

           गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे संभाव्य धोके ओळखून करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने विसर्जनाकरिता होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात सर्वच ठिकाणी घरोघरी जाऊन गणेश मूर्तीचे संकलन करण्याचा निर्णय घेतला. युवक काँग्रेसने केलेल्या नियोजन बद्ध व्यवस्थेमुळे शहरात गणेश विसर्जन शांततेत व सुरळीत पार पडले आहे.

       यावेळी माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जेष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,दिलीप नागरे, मनोज लबडे, रितेश रोटे,आशिष धनवटे, किरण परदेशी,युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ फड, प्रवीण नवले, संतोष परदेशी, अभिजित लिपटे, सुहास परदेशी, दिपक वमने, प्रविण इंगळे, सरबजीतसिंग चुग,सतीश पाटणी,  सागर दुपाटी, पंजाबराव भोसले, संजय गोसावी,चंद्रकांत कर्णावट, गोपाल लिंगायत,सनी मंडलिक, तेजस मोरगे, राहुल बागुल, आशिष मोरे, अजय धाकतोडे, अमोल शेटे, गणेश क्षिरसागर, कल्पेश पाटणी, सिद्धांत छल्लारे, योगेश धसाळ,विशाल साळवे, निलेश कारवाल यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 युवक काँग्रेसच्या उपक्रमाचे पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल  मदने, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी  कौतुक केले आहे. 
______________________________________

पालिका प्रशासनाचा फज्जा; युवक काँग्रेसचे नियोजनबद्ध काम

श्रीरामपूर शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करणेकरिता पालिकेच्या सत्ताधार्यांनी ७ वाहनांची व्यवस्था केली होती. सदर वाहनांमध्ये कचरा संकलन करणाऱ्या गाड्या वापरण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले व त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली.दरम्यान उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने शहरात १० वाहनाची व्यवस्था केल्याने शहरात नियोजनबद्ध गणेश विसर्जन संपन्न झाले.
____________________________________

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post