साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 ऑगस्ट 2020
बेलापूर (प्रतिनिधी) ऐकेकाळी जिवंत देखाव्यासाठी जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या बेलापूर गावातील जय श्रीराम ग्रुपने बसविलेल्या गणपती बाप्पा समोर, पोलीस व डाँक्टर यांच्या प्रतिकृती तयार करुन कोरोनाचे संदेश देणारे फलक लावल्यामुळे मंडळाचा गणपती बाप्पा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
बेलापूरातील जय श्रीराम ग्रुपच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली. दर वर्षीपेक्षा या वर्षीचा गणेशोत्सव कोरोनामुळे शांततेत साजरा करावा लागलाअसे असले तरी, सौ.नम्रता जितेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतुन जय श्रीराम ग्रुप मंडळाने कोरोना बाबत वेगवेगळे संदेश समाजा पर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे . कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस दादा तसेच वैद्यकीय सेवा देणारे डाँक्टर याच्या प्रतिकृती तयार करुन त्याच्या कामाविषयी कृतघ्नता व्यक्त करण्यात आली आहे तसेच फलकाद्वारे वेगवेगळे जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहे.
या संदेशात 'आम्ही बेलापूरकर देणार प्रशासनाला साथ', 'करु कोरोनावर यशस्वी मात', 'घाबरु नका पण जागृक रहा', 'स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेवा' , 'आरोग्य हीच खरी संपत्ती' , 'तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित', 'मास्क वापरा कोरोनाला हटवा', 'सँनिटायझरचा वापर करा सुरक्षित अंतर ठेवा', असे संदेश फलकावर लिहुन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
सौ नम्रता वर्मा यांना मंडळाचे अक्षय ओहोळ, श्रेयस गांधी, अक्षय लढ्ढा, ऋषीकेश सराफ, निरज राठी, ऋषीकेश मुंदडा, स्वप्निल ओहोळ, यश वर्मा, अशुतोष थोरात, कौस्तुभ कुलकर्णी, धिरज सुर्यवंशी, आकाश वांढेकर, आदित्य कोळसे, हितेश बोरुडे, जितेद्र वर्मा मंगेश आदिंनी सहकार्य केले.