श्रीरामपूरात दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा

D
साईकिरण टाइम्स ब्युरो, 13ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | मानाची दहीहंडी समजल्या  जाणाऱ्या, श्रीरामपुर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
हेही वाचा... सोशल डिस्टन्सिंग पाळत मेनरोड वरील स्टॉलधारकांना परवानगी द्यावी
                श्रीरामपूरचे आराध्यदैवत प्रभू श्रीराम मंदिरात बालगोपाळ शिवराज अंभोरे, साईराज कांबळे यांच्या हस्ते दहिहंडी फोडून हा उत्सव साजरा करण्यात आला.  प्रभू श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करून पुढील वर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करता यावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अटी नियमाचे पालन करून व श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्यात आला.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post