साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | अयोध्येत होत असलेल्या 'श्रीराम मंदिर भूमिपूजना'निमित्त आज (दि.5) विश्व हिंदू परिषद, बजरंग दल श्रीरामपूर यांच्याकडून शहरातील अमरधाम येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे महाआरती करून व पेढे वाटप केले.
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाचशे वर्षांच्या हा प्रभु श्रीरामचंद्राच्या भव्य मंदिराचा लढा चालू असल्यामुळे आज 5 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य श्रीराम मंदिर भूमिपूजन होणार आहे. देशांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. यावेळी बेलापूर रोड मित्रमंडळाच पै.चंद्रशेखर आगे व बजरंग दलाचे रुपेश भैया हरकल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रतिमेचे पूजन एस न्यूज वृत्त मराठी वाहिनीचे जयेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री योगेश ओझा, प्रसाद बिल्दीकर, बाळासाहेब हरदास यांनी दिली. यावेळेस सोशल डिस्टंसिंग पालन करण्यात आले. सर्वांनी मास्कचा वापर केला प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता अतिशय शांततेच्या मार्गाने प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजनाच्या जल्लोष साजरा केला गेला.