साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
शिरसगाव (वार्ताहर )भूमी फौंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आदी कार्यात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले.
भूमी फौंडेशनच्या वतीने इनेजिक केगन वाटर ( INAGIC KANGEN WATER) या जपान कंपनीचे ७ लाख रुपये किमतीचे अल्कालीन वाटर आयनायझर मशीन सरला बेट भक्तीस्थानास प्रा.कैलास पवार,तुकाराम तांगडे,ओमकार देशपांडे,बी आर चेडे,भीमराज बागुल,यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आले. १९७२ पासून ही मशीन कार्यरत असून अमेरिकन एन्टी कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे रुग्णासाठी वापर केला जातो.इनाजिक केंगन वाटर विविध प्रकारच्या आजारावर उपचारात्मक ठरते.अशा स्वरूपाचे हे आयनाझर प्लाटिनीयम,व टायटीयनम किटचे बनविण्यात आले आहे.
यावेळी वैजापूरचे आ.प्रा.रमेश बोरणारे, संचेती,बाबसाहेब जगताप रामभाऊ त्रिभुवन,भानुदास पवार,कडूभाऊ पवार,नारायण वराडे,बाबुराव मगर,कचरू महांकाळे,सुनील महान्काळे,अशोक पवार,भाऊसाहेब चोरमल,अप्पासाहेब मगर,नारायण बडाख,दत्तू पवार,छबू पवार,मुरली दातीर आदी उपस्थित होते.५ प्रकारचे पाणी देणारे हे मशीन विविध आजारापासून मुक्तता करते.आ.रमेश बोरणारे यांच्या उपस्थितीत व महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते कोरोना संकट काळात ज्यांनी योगदान दिले त्यांना प्रमाणपत्रे सत्कार करून देण्यात आली.महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भूमी फौंडेशन संस्थापक प्रा,कैलास पवार,तुकाराम तांगडे,ओमकार देशपांडे भीमराज बागुल व जागतिक संविधान संसदीय संघ सदस्य व पत्रकार बी आर चेडे यांची श्रीरामपूर मुख्यालय प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झालेबद्द्ल सन्मान करण्यात आला. यावेळी सरला बेटाकडे येणाऱ्या रस्त्यावर लवकरच पूल बांधण्यात येणार असल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले .