पानेगाव (ता.नेवासे) सोयाबीन न उगल्यामुळे नेवासे तालुका तक्रार निवारण समितीच्या वतीने पाहणी करताना कृषी अधिकारी तसेच शेतकरी (छाया : बाळासाहेब नवगिरे)
_______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
पानेगाव (वार्ताहर) यंदा जिल्ह्यात सोयाबीन पेरा वाढला; परंतु नामांकित कंपन्याबरोबरच बहुतेक सोयाबीन बियाणे न उगल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सोयाबीन बियाणे न उगलेल्या शेतकऱ्यांचे तालुका कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात असून उगवण न झालेले नमुने पुणे येथील लँबला पाठविण्यात आले असल्याचे तक्रार निवारण समितीने सांगितले.
याची मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतल्यामुळे तातडीने कृषी विभागाला आदेश देवुन वस्तुस्थिती जाणण्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे न उगल्यामुळे थेट नेवासे तालुका कृषी विभागाकडे तक्रारी केल्यामुळे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सचिव, तालुका कृषी अधिकारी तसेच माहत्मा फुले कृषी विद्यापीठ सोयाबीन शास्त्रज्ञ , महाबीज प्रतिनीधी, कृषी सेवा दुकानदार प्रतिनिधी यांनी कांगोणी,जळके बु.नेवासे बु.सुरेशनगर पानेगाव, शिरेगाव येथे प्रत्यक्षात तक्रारदार शेतकऱ्यांचा प्लाँट वरती जावून वस्तुस्थिती जाणून घेतली. उगवण न झालेल्या सोयाबीन पिकांचे क्षेत्राचे पंचनामे करुन नेवासे तालुक्यात जवळपास 2 हजार 250 हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली असून 34 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे न उगल्याच्या तक्रारी निवारण समितीकडे करण्यात केल्या होत्या. जे बियाणे उगले नसल्याचे नमुने पुणे येथील लँबला पाठविण्यात आले असल्याचे सांगून 47 हेक्टरची तपासणी केली आसल्याचे तक्रार निवारण समितीने सांगितले.
यावेळी समितीचे अध्यक्ष तथा तालुका कृषी अधिकारी डमाळे डी,पी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी तथा सचिव श्रीमती मैड एस एम, माहत्मा फुले कृषी विद्यापीठ चे सोयाबीन शास्त्रज्ञ डॉ. सुखदेव रणसिंग तालुक्यातील मंडल अधिकारी, कृषी सह्हायक शेतकरी उपस्थित होते.
Tags
कृषि