१२ वी परीक्षा निकालात मुली आघाडीवर ; नगर जिल्ह्याचा निकाल ढासळला

File photo 
साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
शिरसगाव (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून बोर्डाचा निकाल ९१.९७ टक्के लागला असून यावर्षी सुद्धा मुलांपेक्षा ७.१९ टक्क्यांनी मुलीच आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ढासळला आहे. जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

           यंदा अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ६३५१३ पैकी ५८४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ३८६८२ मुले तर २६८३१ मुलींचा समावेश आहे. शास्त्र शाखेचा ९१.०१,वाणिज्य ९४.५५, कला शाखा ८०.६१ टक्के निकाल लागला आहे.कर्जतचा निकाल सर्वाधिक ९५.७५,तर सर्वात कमी श्रीरामपूरचा ८५.३२ टक्के निकाल लागला आहे.तालुल्याचे निकाल-अकोले ८९.३६,जामखेड ९४.५२,कर्जत ९५.७५,कोपरगाव ८९.३८,नगर ९१.५९,नेवासा ८९.९८,पारनेर ९३.७१,पाथर्डी ९४.२२,राहता ९२.५२,राहुरी ८९.२२,संगमनेर ९४.६०,शेवगाव ९४.५७,श्रीगोंदा ९०.३४,श्रीरामपूर ८५.३२ टक्के.कोकण विभागाचे निकालात ९ व्या वेळी वर्चस्व असून निकाल ९५.८९ टक्के आहे.व औरंगाबाद विभागाचा ८८.१८ टक्के आहे.रिपिटरमध्ये जिल्ह्याचा तिसरा क्रमांक पटकाविला.२९६१ विद्यार्थीपैकी अवघे ८१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ७७.७७ टक्के निकाल लागला असून विद्यालयात शुभांगी कांबळे प्रथम गुण ४७९,अस्मिता गोलवड व्दितीय गुण ४६५.जयश्री कणसे तृतीय ४४० गुण या विद्यार्थ्यांचे खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन पुष्पाताई आदिक,सचिव अविनाश आदिक,प्राचार्य जयकर मगर व शिक्षक व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post