श्री घोडेश्वरी विद्यालयाच्या 12 वी परीक्षेत मुलींनी मारली बाजी ; कला शाखा 86 %, विज्ञान 100 %

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

             विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला असून यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे विज्ञान शाखेच्या नवले पूजा संजय 69.68% हिने विद्यालयात प्रथम ,शिदोरे नारायण शिवाजी द्वितीय तर चेमटे स्वप्नाली सुनील हिने तृतीय क्रमांक मिळवला तर कला शाखेचा 86 टक्के निकाल लागला असून मोरे कविता सोमनाथ 78% हिने कला शाखेत प्रथम ,तर पाटोळे साक्षी अरुण द्वितीय तर सोनवणे ज्ञानेश्वरी सुभाष हिने तृतीय क्रमांक मिळवला.

        विद्यालयाच्या प्राचार्या सौ.शेरकर ए.यु ,पर्यवेक्षक साठे ,प्रा.दारकुंडे एस.आर , प्रा.कदम डी. व्ही. , प्रा. सादरे एम जी ,प्रा. सुंबे एस एम ,प्रा. ठोंबरे एस आर .यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष  मा आ नंदकुमार झावरे मा जे डी खानदेशे सचिव अनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आदींनी अभिनंदन केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post