"वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड - २०२०" साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

साईकिरण टाइम्स ब्युरो 15 जुलै 2020
श्रीरामपूर | वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघ यांच्या वतीने   "वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड - २०२०" या आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी दिली आहे.

                " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड " हा प्रामुख्याने सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, वैज्ञानिक अभियांत्रिकी, क्रिडा, कला, साहित्य, पत्रकारीता, रक्षा - सुरक्षा, ऐतिहासीक बाबींचे संग्राहक, ट्रेकींग, नृत्य, अभिनय, संगीत, धार्मिक या समाजातील महत्वाच्या क्षेत्रात राष्ट्रीय,      आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्तींना            दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने माहीती पाठवावी लागेल. त्यासाठी wcpashrirampur@gmail.com या मेल आयडी चा उपयोग करावा.  तसेच 9096372082 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगष्ट २०२० ही असेल.

                   पुरस्कारामध्ये मानपत्र, सन्मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे आजीव सदस्यत्व यांचा समावेश आहे.  पुरस्कार वितरणाची तारीख कोविड-१९ ची परिस्थिती व शासकीय आदेश यांचा आदर करून ठरविली जाईल व ती आपणास यथायोग्यरित्या कळविली जाईल. पुरस्कार वितरण सोहळा श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथे होणार आहे. अशी माहीती दत्ता विघावे यांनी दिली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post