राहुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि. मुकंदराव देशमुख यांचा कार्याचा गौरव करतांना मुळाथडी पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप,तसेच प्रवरा पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष रणछोडदास जाधव.
______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जुलै 2020
राहुरी | राहुरी तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र जनसामान्यांनासाठी काम करणारे येथील वरिष्ठ पो.नि.मुकुंदराव देशमुख यांचे काम कौतुकास्पद आसल्याचे, त्यांचा पोलीस ठाण्यात गौरव करतांना मुळाथडी पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप व प्रवरा पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष रणछोडदास जाधव यांनी म्हटले.
तालुक्याचे कार्यक्षेत्र हे मोठे असून येथून जाणारा राष्ट्रीय महामार्गामुळे नेहमीच पोलीस प्रशासनाला दक्ष रहावे लागते. या अगोदर विद्यापीठ परीसरात रोजच रात्री तसेच काही वेळेस तर दिवसा दोनचाकी, चारचाकी,तसेच ट्रांन्सपोर्ट गाड्यांची लुट होत होती. पो.नि.देशमुख यांनी तातडीने बंदोबस्त केला. राहुरी परीसरात टुव्हिलर गाड्या चोरांनी नुसते थैमान घातले होते त्या चोरांचा बंदोबस्त करुन सामन्यांना मोठा दिलासा मिळाला. पोलीस ठाण्यात न्याय मागणाऱ्या येणाऱ्या व्यक्तिंना तातडीने प्रश्न निकाली काढून होणारी ये जा थाबविण्यासाठी नेहमी कटिबद्ध आसतात. तालुक्यात आसणारे अवैध धंदे तसेच वाळुतस्कांरवर चांगलाच पायबंद घातला आहे. या बरोबरच सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आसुन भारतात सुद्धा परिस्थिती गंभीर आहे. आता आपल्या जिल्ह्यात हि वाढत चालले कोरोना रुग्ण आता याचे लोण ग्रामीण भागात पाहवयास मिळत असून अशा परिस्थितीत पोलीस, तसेच महसूल प्रशासन डोळ्यात तेल घालून जनसामान्यांना साठी रात्रंदिवस काम करत आहे. स्वतः काविळ आजाराने त्रस्त आसताना हि कुठलेहि सुट्टी न घेता आपली कामाची जवाबदारी त्यांनी पाळली. पो नि. देशमुख यांचे काम नेहमी जनसामान्यांनासाठी कौतुकास्पद आसते असे घोलप, जाधव यांनी सांगितले. यावेळी कपिल पाटील जाधव उपस्थित होते.
राहुरी तालुका पोलीस ठाण्याचे मोठे कार्यक्षेत्र आसल्याने त्याचे विभाजन म्हणून देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाण्याची मंजुरी आसून तातडीने होण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करणार आसल्याचे- रणछोडदास जाधव यांनी यावेळी सांगितले.