खंडित डाक जीवन विमा ३० ऑगस्टपर्यंत पुनरुज्जीवित करण्याची विमाधारकांना संधी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जुलै 2020
अहमदनगर | भारतीय डाक विभागाची डाक जीवन विमा ही लाभाची योजना भारत सरकारने १९८४ पासून सुरु केली आहे. सध्या अहमदनगर डाक विभागामध्ये डाक जीवन विमा अंतर्गत असलेल्या एकूण १ लाख ३९ हजार २७५ पॉलिसी खंडित झाल्या आहेत. त्या पुनरुज्जीवीत करण्याची संधी भारतीय डाक विभागाने विमाधारकांना उपलब्ध करुन दिली आहे.

            टपाल जीवन वीमा योजना आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत खंडित झालेल्या पॉलिसी ३० ऑगस्ट२०२० पर्यंत पुनरुज्जीवीत करता येतील, अशी माहिती भारतीय डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी दिली आहे. ज्या पॉलिसी खंडित झालेल्या असतील तसेच ज्या पॉलिसी सुरु केल्यापासून सतत ५ वर्षे भरणा न केल्यामुळे खंडित पडल्या असतील, तर त्यांना पुनरुज्जीवीत करत सर्वसामान्य विमाधारकांना त्याचा लाभ मिळू शकतो. पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वास्थ्य असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे डाक विभागाने कळविले आहे. तरी, सर्व खंडित विमा पॉलिसी पुनरुज्जीवीत करुन घ्याव्यात, असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post