साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जुलै 2020
श्रीरामपूर | संयुक्त राष्ट्रसंघाच्या बुध्दीजीवी गटाचे ( युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल ) भारताचे सदस्य तथा वर्ल्ड कॉान्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनचे ( डब्ल्यूसीपीए ) महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष व जेष्ठ क्रिकेट समिक्षक दत्ता विघावे यांचा भारतातील विविध सामाजिक संस्थानी ऑनलाईक पद्धतीने सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
सध्या जगभर कोरोना व्हायरस ( कोविड-१९ ) या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून भारतातही या रोगाची मोठया प्रमाणात लागण झाली असून तिला रोखण्यासाठी समाजाच्या विविध स्तरातून प्रयत्न सुरू असून श्री. दत्ता विघावे हे डब्ल्यूसीपीएच्या माध्यमातून समाजप्रबोधन व पिडीतांना साहाय्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत "जिविका फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष राज तेलंग. यांनी "कोविड योद्धा अवॉर्ड" तायक्वांदो स्पोर्टस् असोशिएशन चर्खी दादरी ( चंदिगड ) हरियाणा, अध्यक्ष श्री. सुदेश वर्मा यांनी " सेवा योद्धा अवॉर्ड" तर महाराष्ट्र पत्रकार संघ ( ठाणे जिल्हा ) महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर, व डॉ. श्री. शंकर ( राज ) परब, ठाणे जिल्हाध्यक्ष यांनी , " जागवली माणुसकी पुरस्कार २०२० " देऊन सन्मानित केले असून दत्ता विघावे यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.