साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जुलै 2020
बेलापूर (प्रतिनिधी) कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याचे माहीत आसतानाही हलगर्जीपणा दाखवुन किराणा दुकान सुरु ठेवल्याच्या कारणावरुन बेलापूर पोलीसांनी आज एका किराणा दुकानदारासह दोन जणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा.... बेलापूर रोड परिसरातील नागरिकांच्या तात्काळ टेस्ट कराव्यात ; सौ.स्नेहल केतन खोरे
हेही वाचा.... बेलापूर रोड परिसरातील नागरिकांच्या तात्काळ टेस्ट कराव्यात ; सौ.स्नेहल केतन खोरे
कोरोनामुळे गावातील दुकाने पाच वाजता बंद करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना त्यानंतरही दुकान उघडी ठेवुन कायद्याचा भंग करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध बेलापूर पोलीसांनी प्रथमच कारवाई केली आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे माहीत असताना, तोंडास कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता, कोणतीही खबरदारी न घेता सदर आजार पसरण्याचा संभव असल्याचे माहीत असुनही हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांनी त्याच्या मालकीचे ओंकार किराणा स्टोअर्स नावाच्या दुकानात किराणा मालाचे गीऱ्हाहीक करुन कोरोना आजाराचा संसर्ग होवुन स्वतःचे व इतराच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशचा भंग केल्यावरुन हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांचेविरुध्द पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जाकीर असीफ शेख (रा. गोंधवणी, श्रीरामपूर) याने आपल्या ताब्यातील मोटार सायकल टी.व्ही.एस. स्टार सीटीने (एम.एच १७ सी.बी. ५९११) मास्क न वापरता विनाकारण फिरत असताना आढळून आला. पोलिस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापूर पोलीसांनी गेल्या काही दिवसात विनाकारण फिरणारे मास्क न वापरणारे यांच्या विरुध्द जोरदार मोहीम सुरु केली असुन ग्रामस्थांनी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर पोपट भोईटे निखील तमनर यांचे अभिनंदन केले आहे.