उक्कलगाव | प्रतिनिधी | येथील खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आणि रावसाहेब बाळाजी पाटील थोरात या ज्युनिअर काॅलेजाचा निकाल 68% टक्के इतका लागला आहे.
फेब्रुवारीत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत विद्यालयात कु.आश्लेषा जालिदर धनवटे हिस 74.30% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळाला तसेच कु सीमा रमेश मेहेत्रे हिला विद्यालयात 58.92% गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळविला तर कु भारती रावसाहेब धनवटे विद्यालयात 51.84% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवत परिक्षेत यश संपादन केले.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेच्या संस्थेच्या चेअरमन श्रीमती पुष्पाताई आदिक, संस्थेचे सचिव अविनाश आदिक, सहसचिव शहारामजी शेटे, श्रीरामपूर तालुक्याचे जेष्ठ नेते इंद्रनाथ पा थोरात, संस्थेचे सदस्य सुनिल बन्सीभाऊ थोरात, प्राचार्य सौ सुमती औताडे, प्रा रमेश वल्टे, प्रा नामदेव आडसूळ, प्रा बाळासाहेब थोरात, प्रा बाळासाहेब निमसे, प्राध्यापिका बेबी राऊत, प्रा दिलीप कडू, प्रा संगिता खपके आदीसह सर्व ग्रामस्थांनी,शिक्षक,शिक्षकत्तेर, व सेवक वर्ग कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.