साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
श्रीरामपूर | अवैध मुरूम वाहतूक करणारा विनाक्रमांक टेम्पो गुरुवारी ( दि. 16) तलाठयांनी पकडला. त्यात 2 ब्रास मुरूम आढळून आला आहे. मुरुमाने भरलेला टेम्पो नगर रोडवरून बेलापूरच्या दिशेने जात असताना ही कारवाई करण्यात आली.
तलाठी श्रीमती मोटे यांनी, टेम्पो ड्रायव्हरकडे चौकशी केली असता रस्त्याच्या कामासाठी चालला असल्याचे त्याने सांगितले. तलाठी श्रीमती मोटे यांनी कारवाई केल्यानंतर टेम्पो बेलापूर पोलिस ठाण्यात लावण्यात आला. तलाठी मोटे यांनी वरिष्ठांना कारवाईची माहिती दिली. तहसीलदार प्रशांत पाटील आदेशानुसार टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अद्यापही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.