12वी परीक्षेचा केशव गोविंद महाविद्यालयाचा 97% निकाल

साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 जुलै 2020
श्रीरामपूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एचएससी ( 12 वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खु. येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.९८% लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९६.१५ % तर विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ % इतका लागला आहे. 

                     वाणिज्य शाखेत पवन देशपांडे याने प्रथम  (६६.६७ % ),  श्वेता थोरात हिने द्वितीय (६५.८४ %) तर पूजा महाडिक हिने (६५.६९ %) तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेत कृष्णा नागरे प्रथम ( ७३.२३ %), स्नेहल पुंड द्वितीय (७०.४६ %) तर श्रद्धा भांड हिने तृतीय (६७.८४ %) क्रमांक मिळवला आहे. 

                 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, सेक्रटरी महेश पाटील, अधीक्षक श्री पारखे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. 
            
    

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post