साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जुलै 2020
वाकड़ी | प्रतिनिधी | राहाता तालुक्यातील वाकड़ी येथील खंडेराय मंदिरातील सोमवती अमावश्या सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
सध्या सर्वत्र कोरोना या गंभीर आजाराने थैमान घातले असताना सर्वत्र मंदिर बंद असुन मोठे उत्सव यात्रा बंद आहे वाकड़ी येथील खंडोबा मंदिरातील सोमवती अमावश्या सोहळ्यास खंड पडू नये म्हणून कुठलीही मिरवणूक पालखी सोहळा न काढता मोजक्या भाविकांनी सकाळी 9 वाजता दुचाकीवरुण देवाचे मुखवटे पूणतांबा येथील गोदावरी नदीत स्नान घालण्यासाठी नेले व तेथील पूजा करुण पुन्हा लगेच वाकड़ी येथील खंडोबा मंदिरात दुपारी 12 वाजता येऊन देवाची आरती व पूजा करण्यात आली.
यावेळी खंडोबा मंदिरातील पुजारी संजय घोड़के,दत्तात्रय नेमाने (वाघे)जालिंदर राहींज (वाघे), सावळेराम आहेर,बाळासाहेब लहारे,वसंत डोखे,शरद डोखे आदि मल्हारीभक्त उपस्थित होते.