साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जुलै 2020
श्रीरामपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत श्रीरामपूरतील शहरी भागील पथविक्रेता, फेरीवाला, ठेलेवाला यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून 10 हजार रुपये ऐवढे खेळते भांडवल कर्ज रूपाने उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर यांनी दिली.
भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी, या विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच केशकर्तन दुकाने चर्मकार, पान दुकाने ,कपडे धुण्याची दुकाने यांचाही समावेश केला गेला आहे.
ही योजना शहरी भागासाठी असून श्रीरामपुर या शहरातील क्षेत्रातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ भेटणार आहे. असे सौदागर यांनी सांगितले. मान्यता दिलेल्या यादीमध्ये ज्या पथविक्रेत्यांचे नाव असेल त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेसाठी नगरपरिषदेचे तात्पुरते विक्री प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, वाहन परवाना (असल्यास), बॅक पासबुक झेरॉक्स, स्वतःचा फोटो, आधार लिंक असलेला मोबाइल नंबर या कागद पत्रांची आवश्यकता आहे.
या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये विणातारण खेळते भांडवल मिळेल नियमित हफ्ते भरल्यास व्याजात 7 टक्के सूट मिळेल. तसेच हे खेळते भांडवल वेळेवर भरल्यास पुढच्या मोठ्या भांडवलाची हमी दिलेली आहे. डिजिटल व्यवहार केल्यास 1200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
या योजनेसंदर्भात काही अडचण आल्यास संबंधित स्थानिक नगरपालिका कार्यालयात यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हाभर पथविक्रेता, फेरीवाला, ठेलेवाला यांना कागदपत्रे असतांना हि योजनेबाबत काही अडचणी असल्यास 9822836736 ह्या व्हाट्सअप नंबर वरवर कागदपत्रे पाठवुन, योजनेबाबत काही अडचणी लेखी कळवावे.
योग्य ते सहकार्य शहरातील पथविक्रेता, फेरीवाला, ठेलेवाला यांना केले जाईल, अशी माहिती भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर यांनी दिली.