भाजपाच्या व्हर्च्युअल सभेत उत्तर नगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक ; जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोदकर

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षंपूर्तीनिमित्ताने व्यक्तिगत संपर्क, डिजिटल संपर्क, व्हर्च्युअल संवाद यासारखे विविध कार्यक्रमाने साजरे करण्यात आले तर व्हर्च्युअल सभेत ऊत्तर नगर जिल्हाने पहिला क्रमांक मिळवला, अशी माहिती भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोदकर यांनी दिली.  

                    जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सहा वर्ष पूर्ण केल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते; परंतु कोविड १९ कोरोनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गर्दी न करता कार्यक्रम करण्यावर भर देण्यात आला. व्हर्च्युअल सभा नवीन तंत्रज्ञानचा फायदा घेत जनतेपर्यंत पोहचण्यास मदत केली.

          व्हर्च्युअल सभा यामाध्यमातून उत्तर महाराष्ट्रसाठी संरक्षणमंत्री ना.राजनाथसिंह यांनी सवांद साधला. युट्युब, फेसबुक, कॉल यासारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यातील साडेतीन लाख नागरिकांनी ऑनलाईन उपस्थित राहून उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचे प्रेक्षक होते. ही अभिमानास्पद  बाब आहे. हे सर्व सोशल मिडियाच्या माध्यमातून युवकांनी केलेली कामगिरी असून माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, मधुकरराव पिचड, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

            विधानसभा मतदारसंघात व्हर्च्युअल सभा घेण्यात आल्या यामध्ये श्रीरामपूरला जळगाव चे खासदार उन्मेष दादा पाटील, संगमनेर व कोपरगावला माजी मंत्री आमदार गिरीष महाजन, शिर्डी ला आमदार देवयानी फरांदे, नेवासा ला माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, अकोले ला माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधला. या सभांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. यामध्ये मोदीजीनी या वर्षभरात ३७०, ३७अ कलम रद्द करणे, तीन तलाक रद्द करणे, राम मंदिर उभारणी, काश्मीर प्रश्न सोडवणे, आत्मनिर्भर भारत बनविणे, कोरोना महामारीच्या काळात योग्य निर्णय घेणे. यासारख्या विषयावर मार्गदर्शन केले. तर राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची मदत जनतेला केली नाही यावर टीकेची झोड उठवली. यासभेचे जिल्हासंयोजक योगीराज परदेशी, विशाल यादव, परिमल देशपांडे यांनी नियोजन केले.  

          डिजिटल संपर्काच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यातील १६२५ बूथ वरती व्हाट्सअप्पच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला १४५५ बूथ वर ग्रुप बनविण्यात आले. त्यामाध्यमातून एक लाख कार्यकर्त्यांनशी संपर्क होत आहे व पुढील काळात दोन लाख सोशल मीडिया कार्यकर्ते जोडले जाणार आहे. यामध्यमातून नरेंद्र मोदी नी दिल्लीत केलेली घोषणा गल्लीत दहा मिनिटात पोहचली पाहिजे,  अशी योजना तयार केल्याची माहिती जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

          कुटुंब सवांदच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले. प्रत्येक बूथवर शंभर कुटुंबशी संपर्क करण्यात आला साठ हजार कुटुंबात पंतप्रधानाचे पत्र देण्यात आले. यावेळी मास्क, सॅनिटयायरचे वाटप करण्यात आले. अशी माहिती जिल्हासंयोजक शरद थोरात, गणेश राठी, मेघा भगत यांनी दिली.

           भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली कोविड च्या काळात रक्तदान शिबिरामुळे नागरिकांना मदत होईल म्हणून युवकांना यासाठी प्रेरित करण्यात आले. अशी माहिती रक्तदान शिबीर जिल्हासंयोजक श्रीराज डेरे यांनी दिली.

             नरेंद्र मोदी सरकार दोनच्या वर्षपूर्ती निमित्ताने संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे ( अकोले ), डॉ अशोक इथापे ( संगमनेर ), नितीन दिनकर ( नेवासा ), सुनील वाणी (श्रीरामपूर ), नंदकुमार जेजुरकर (राहता ), साहेबराव रोहम ( कोपरगाव ), राजेंद्र सांगळे (संगमनेर शहर ), कैलास खैरे ( कोपरगाव शहर ), अशोक पवार, किरण बोरुडे (शिर्डी ), सतीश सौदागर ( श्रीरामपूर ) यांनी मोलाचे सहकार्य केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post