'राजगृह' व म. फुले यांच्या स्मारकावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जुलै 2020
श्रीरामपूर |  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' वर झालेला भ्याड हल्ला तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या यवतमाळ येथील स्मारकावर झालेला हल्ला, यावर महाराष्ट्र शासनाने कमिटी बनवून चौकशी करावी व यांस जबाबदार असणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केली आहे. 

             याबाबत, शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, काही दिवसापूर्वी 'राजगृह' वर हल्ला करण्यात आला. नुकतीच समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची काही माथेफिरूंनी तोडफोड केली. असे हल्ले वारंवार होत आहेत. 

             ज्या महापुरुषांनी अहोरात्र समाजासाठी आपले आयुष्य वेचले त्याच महापुरुषांच्या स्मारकांवर हल्ले होत आहे. असले भ्याड हल्ले, स्मारक किंवा इतर कोणत्या गोष्टीची अव्हेलना करण्याची धमक कोणी करू नये, यासाठी शासनाने कमिटी बनवून चौकशी करावी व अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, असे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी म्हंटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post