उक्कलगावतील धनवाट रस्त्याचा बट्ट्याबोळ ; जड वाहतुकीमुळे रस्ता खचला

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
श्रीरामपूर  | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील 'धनवाट' रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. जड वाहतुकीमुळे रस्ता पुरता खचला आहे. रस्त्यावर  ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय होतो. नागरिकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

                ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे.  खड्डे आणि खड्डेमय रस्ते असे 'गाव अंतर्गत' रस्त्याची अवस्था चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या पंचवीस - तीस वर्षात धनवाट परिसरातील गावकर्‍यांना प्रंचड हाल सोसावे लागत असतानाच, अडीच वर्षातच जि प सदस्या सौ आशाताई दिघे यांच्या प्रयत्नाने स्थानिक निधीतून व अहमदनगर जि.प.चे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांच्या प्रयत्नातून निवडणुकीपुर्वीच देऊ केलेले आश्वासन धनवाटकारांना रस्त्याच्या रूपाने मिळाले होते ते आश्वासन त्यांनीही सार्थ ठरवत पुर्णही केले. अडीच वर्षातच काळात डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन वाहतुक सुरळीतपणे सुरू होती ;पण आजमितीला या रस्त्याला खड्डेच खड्डे पडून पुर्णपणे खचला गेला आहे. जडवाहतुकीमुळे खड्डेच - खड्डे पडल्यामुळे गाड्याही फसत आहे. जडवाहतुकीला कारणीभुत कोण? असा उपस्थित सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. 

काही दिवसांपूर्वी 'लम्हाणबाबा' रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्ता सुरळीतपणे वाहतुकीसाठी खुला झाला होता. या रस्त्यावरुन मुरूमाचे 'होलवा' नेले. रस्ता खचून चिरा पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यास जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post