शाळा, महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्काची मागणी केल्यास युवासेनेशी संपर्क करावा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
श्रीरामपूर | राज्य सरकारने प्रत्यक्ष शाळा व महाविद्यालये सुरु होत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्क भरण्यास मुभा दिली आहे. शैक्षणिक वर्ष कधी सुरु करावे हे अजुन निश्चित नाही, असे असतांना काही शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था चालु वर्षाची शैक्षणिक फी ची मागणी, अशी कुठलीही मागणी होत असेल तर पालकांनी व नागरिकांनी युवासेनेला संपर्क करावा, असे आवाहन युवासेनेचे उमेश पवार यांनी केले आहे. 

            सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने जगासमोर महामारीचे संकट उभे आहे. याचा परिणाम जगामध्ये सामाजिक,आर्थिक,आरोग्य व शिक्षण या क्षेत्रावर झाला आहे. शिक्षण क्षेत्रात शाळा व महाविद्यालये सुरु कराव्या अथवा नाही हे अनिश्चित आहे. तसेच जिथं शाळा व महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही तिथं आँनलाईन माध्यमातून नियमावलीच्या आधारे चालु वर्ष व नविन वर्षाची करण्याचे राज्य सरकारने सुचित केले आहे. 

       शैक्षणिक वर्ष कधी सुरु करावे हे अजुन निश्चित नाही असे असतांना काही शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था २०१९-२० या चालु वर्षाची शैक्षणिक फी ची मागणी पालकांना करत आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थ व्यवस्थेला खीळ बसली आहे. अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पालक शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. यामुळे राज्य सरकारने प्रत्यक्ष शाळा व महाविद्यालये सुरु होत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्क भरण्यास मुभा दिली आहे.  काही शाळा व शिक्षण संस्था चालु वर्षाची शैक्षणिक फी ची मागणी पालकांना करत आहे. अशी कुठलीही मागणी होत असेल तर पालकांनी व नागरिकांनी युवासेनेला संपर्क साधावा, असे युवासेनेचे उमेश पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post