साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) यश अकॅडमी चे सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 91 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, पैकी 83 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आर्यन रणजीत जाधव 94.6% गुण मिळवून विद्यालयात प्रथम, ऋतुराज प्रशांत कोरडे 91% गुण मिळवून द्वितीय तर हर्षल अरुणकुमार ढेरे 90.6% गुण मिळवून तृतीय आला.
समाजशास्त्र विषयात 26 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण संपादन केले व यशवंत अनिल मानकर हा 99 गुण मिळवून या विषयात विद्यालयात प्रथम आला. गणित विषयात आर्यन रणजित जाधव 98 गुण मिळवून प्रथम आला. हर्षल अरुण कुमार ढेरे विज्ञान विषयात 95 गुण मिळवून प्रथम आला. ऋतुराज प्रशांत कोरडे इंग्रजी विषयात 96 गुण मिळवून प्रथम आला. हिंदी विषयात साई सतीश वाघाडे 95 गुण मिळवून प्रथम आली. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, इंग्रजी माध्यम विद्यालयांचे संचालक श्री हेमंत कुमार शर्मा, प्राचार्या मनिषा साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
यश अकॅडमीच्या सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राचार्य यांचे संस्थेचे संस्थापक मा. खा. यशवंतराव गडाख पाटील , संस्थेचे मार्गदर्शक कॅबिनेट मंत्री माननीय श्री. शंकरराव गडाख पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत गडाख पाटील यांनी अभिनंदन केले.