साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जुलै 2020
श्रीरामपूर | रात्रीच्या वेळी दुचाकीवर जाणाऱ्यांना आडवून मारहाण केली जात,यानंतर त्यांची लुट करणारी सराईत गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात आले आहे. ही विशेष कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २८ जानेवारीला रात्री हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथून मोटार सायकलवरुन निमगाव खैरी मार्गे श्रीरामपूरकडे जात असतांना निमगाव खैरी गावचे शिवारात आले .
यानंतर पाठीमागून दोन मोटार सायकलवरुन आलेल्या चार अनोळखींनी मोटार सायकल थांबवून, हाताने मारहाण करीत एटीएम कार्ड , चेक बुक, पॅनकार्ड, मतदानकार्ड, विवो कंपनीचा मोबाईल, मोटार सायकलची चावी व रोख रक्कम ४५०० रु. बळजबरीने काढून घेतल्याची फिर्याद अंकुश अशोक करंडे ( रा.गोंधवणी, ता . श्रीरामपुर जि.अहमनगर) यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा गोविंद गुंजाळ ( रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती गोपनीय स्था.गु.शाचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पो.नि.पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपी गोविंद बाळासाहेब गुंजाळ ( वय ३२ रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वसात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली. त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार सुदाम सरकाळे, करण गायकवाड व आणखी एक साथीदार असे चौघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.
आरोपी सुदाम सरकाळे व करण गायकवाड यांचे टावठिकाणा बाबत व गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे साथीदार हे गढी, ता. गेवराई जि. बीड येथे आहे.
चोरलेला मुद्देमाल त्यांचेकडे असल्याचे सांगितल्याने सदर माहितीच्या अधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गढी, ता. गेवराई जि. बीड येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपी सुधीर उर्फ सुदाम कडुबाळ सरकाळे (वय २३ रा . शहरटाकळी, ता . शेवगाव), करण नवनाथ गायकवाड (वय १८ , रा . निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर ह.रा. पढेगाव ता.श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ८ हजार रु . किमतीचा वीवो कंपनीचा मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली ७५ हजार रु . किमतीची विना क्रमांकाची टीव्हीएस कंपनीची अपाची मॉडेल मोटार सायकल असा एकूण ८३ हजार रु . किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच चौथ्या साथीदाराचा शोध घेतला पंरतु तो मिळुन आलेला नाही. आरोपींसह जप्त मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस हे करीत आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेली अपाची मोटार सायकल ही वैजापूर जि. औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. सदर मोटार सायकल चोरीबाबत वैजापूर पो . स्टे . गु . र . नंबर । ४१३ / २०१ ९ भा . द . वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे .
वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे विरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील व उप विभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभागाचे राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदिप पाटील, पोहेकॉ मनोहर गोसावी , पोना अण्णा पवार , रविंद्र कर्डीले , दिपक शिंदे , पोकॉ प्रकाश वाघ , मयुर गायकवाड , सागर ससाणे व चालक पोकॉ सचिन कोळेकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी गोविंद बाळासाहेब गुंजाळ (वय ३२, रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर) याचे विरुध्द दाखल गन्हे पुढीलप्रमाणे
१) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1६११ / २०१९ भा.द.वि.कलम ३७९, २) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1५९५ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३७९, ३) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४०/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ ,३४, ४) श्रीरामपुर शहर पो.स्टे । ४१/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ४११,३४ ,
५) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४३/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ६) श्रीरामपुर शहर पो.स्टे 1४८/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ३४, ७)श्रीरामपुर शहर पो.स्टे 1 ४२/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ४११,३४, ८)
श्रीरामपुर शहर पो.स्टे 1३९ / २०१७ भा.द.वि.कलम ३७९
९) तोफखाना पो.स्टे 1५१६/२०१७ भा.द.वि.कलम ३९९,४०२ (फरार), १०) राहुरी पो.स्टे 1 २८/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४ ,
११) राहुरी पो.स्टे 1४६४/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, १२) राहाता पो.स्टे 1४८ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३९४,३४ (फरार),
१३ ) सोनई पो.स्टे 1३०/२०२० भा.द.वि.कलम ३९ २,३४१,३४ आर्म अॅ .४ / २५
आरोपी सुधीर उर्फ सुदाम कडुबाळ सरकाळे (वय २३, रा . शहरटाकळी , ता . शेवगाव).
१ ) कोतवाली पो.स्टे 1३३६/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, २) कोतवाली पो.स्टे 1३६२/२०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, ३) कोतवाली पो.स्टे 1 ३६१/२०१७,भा.द.वि.कलम३७९,३४,४) तोफखाना पो.स्टे 1२ ९ ३ / २०१७ भा.द.वि.कलम ३७९, ३४, ५) तोफखाना पो.स्टे 1 २ ९ ५ / २०१७'भा.द.वि.कलम ३७९,३४, ६) कोतवाली पो.स्टे T३६४ / २०१७ भा.द.वि.कलम ३७ ९ , ३४ ७ ) कोतवाली पो.स्टे 1३१०/२०१७ भा.द.वि.कलम ३७९ , ३४, ८) श्रीरामपुर शहर पो.स्टे ॥३५४ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३ ९ ५,३ ९ ४,१२० ( ब ) सह आर्म अँँक्ट कलम ४/२५ , ९ ) सोनई पो.स्टे 1३०/२०२०भा.द.वि.कलम ३९२,३४१,३४ अँँक्ट.कलम ४/२५
आरोपी करण नवनाथ गायकवाड (वय१८, रा . निपाणीवडगाव, ता.श्रीरामपूर ह.रा. पढेगाव ता.श्रीरामपूर)
१ ) सोनई पो.स्टे 1 ३०/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ २,३४१,३४ अॅ.कलम ४/२५