साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जुलै 2020
देवगड (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थान मध्ये उद्या रविवार ( दि.5 ) रोजी होणारा गुरुपौर्णिमा महोत्सव कोरोना (covid19) महामारी मुळे रद्द करत असल्याची, माहिती श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी दिली.
आषाढी एकादशी नंतर होणाऱ्या गुरुपौर्णिमेला लाखो भाविक श्रीगुरु दत्तात्रेय व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस्थळी मोठ्या मनोभावे नतमस्तक होण्यासाठी येत असतात मात्र यावर्षी जगभरात कोरोना या महामारी मुळे सर्वच मंदिरे शासनाच्या नियमानुसार बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे उद्या होणारा गुरुपौर्णिमेचा उत्सव हा रद्द करण्याचा निर्णय देवगड संस्थान ने घेतला आहे भाविकांनी घरी बसूनच श्री भगवान दत्तात्रयांचे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे नामस्मरण करावे व कोणीही देवगड दर्शनास येऊ नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले आहे.