हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पहिला नोव्हेना भक्तिभावाने संपन्न

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जुलै 2020

शिरसगाव (वार्ताहर) संत तेरेजा चर्च हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व पहिला नोव्हेना यु ट्युबवर मतमाउली यात्रा महोत्सव २०२० लाइव प्रक्षेपणाव्दारे भाविकांना घरबसल्या पाहून मतमाउलीचे दर्शन घेता आले.


            सर्वांनी सबस्क्राइब केल्यावर आवश्यक १००० संख्या झाल्यावर भाविकांना लाइव प्रक्षेपणाचा लाभ घेता येणार आहे.आता ६०० भाविक सबसक्राइब झाले आहेत. नोव्हेनाप्रांगी प्रमुख धर्मगुरू यांनी सांगितले की,  आज नऊ शनिवारच्या नोव्हेनाला सुरुवात करीत आहोत. आजचा हेतू आहे की हा जे काही सांगेल ते करा.जो इतरांच्या मदतीला धावतो तोच खरा मित्र असतो. यावेळी स्वर्ग देखील आपल्याला मदतीला येत असतो.या जगात एकच अशी व्यक्ती होऊन गेली आहे ती स्वत:च्या गरजाकडे दुर्लक्ष करते मात्र ती इतरांच्या गरजाकडे लक्ष देते ती म्हणजे आपली आई पवित्र मारियामाता,मतमाउली..आजच्या शुभ वर्तमानात देखील तेच घडले आहे.ती बाळ येशूकडे मध्यस्थी करत असते.आजची जी कोरोनामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. तिच्यापासून मुक्तता व्हावी.पवित्र मारिया ही संपूर्ण विश्वाची माता आहे.आपल्याला कळतही नाही ती केंव्हा आपल्याला मदत करते.ती आपल्या भाविकांच्या सर्व गरजाकडे,संकटाकडे लक्ष देऊन आहे.तिला माहित आहे त्याप्रमाणे तिने प्रभू येशू ख्रिस्ताला भाविकांना मदत करण्यास सांगितले.व माझा पुत्र येशू जे काही सांगेल ते करा.असे नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू पायस यांनी सांगितले.

             नोव्हेनाप्रसंगी रे फा. डॉमनिक,व रिचर्ड सहभागी झाले होते.हरिगाव धर्मग्रामासाठी,संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहाता परीससाठी,पवित्र माता चर्च प्रवरानगर,आदीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.तसे ज्या भाविकांना आपले नवस,पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करावयाचे असल्यास त्यांनी मो.क्र९६७३५४१५०५ वर संपर्क करावा असे आवाहन चर्च व्यवस्थापनाने केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post