साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जुलै 2020
माळवाडगांव | प्रतिनिधी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी पंचायत समिती श्रीरामपूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी माळवाडगांव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.संगिता शिंदे यांच्या हस्ते कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ कोळसे व लांडगे यांनी ऊस,सोयाबीन,मका,डाळिंब या पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच कडलग यांनी पंचायत समितीच्या विविध योजना विषयी माहिती दिली तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पावसे यांनी सेंद्रिय शेती का व कशी करावी याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.यावेळी सभापती यांनी शेती पूरक व्यवसाय व नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच बाबासाहेब पा चिडे यांनीही शेतीविषयक मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक रूपाली काळे यांनी केले तर आभार नानासाहेब आसने यांनी मानले.यावेळी योगेश लटमाळे यांच्या शेतात शिवार फेरी घेण्यात आली.या कार्यक्रमावेळी बाजार समितीचे माजी संचालक गिरीधर आसने,पंचायत समितीचे अधिकारी कडलग,मंडल कृषी अधिकारी गणेश अनारसे,दत्ताञय गागरे,सौ.वनिता जाधव,अजीत पावसे,सौ.काळे,सौ.शिंदे,तायडे,ग्रामसेविका प्रियंका शिंदे शेतकरी नानासाहेब आसने,दिलीप हुरुळे,डॉ पठाण,शरद आसने,सुनिल आसने,राजेंद्र आदिक,गणेश आसने,बाबासाहेब आसने,योगेश लटमाळे,रामकिसन हुरुळे,लक्ष्मण आसने यासह आदी शेतकरी उपस्थित होते.