साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जुलै 2022
शिरसगाव (वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या आत्मनिर्भर मोफत तांदूळ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व इतर जिल्ह्यातून शिरसगाव हरिगाव फाटा येथे आलेल्या ४५ व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी १० किलोप्रमाणे ४५० किलो मोफत तांदूळ सरपंच आबासाहेब गवारे,कामगार तलाठी दीपक साळवे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आला.
सध्या कामधंदा नसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.सरपंच आबासाहेब गवारे यांनी याबाबत तातडीने आलेल्यांची यादी तयार करून आवश्यक मदत शासनाकडून मागविली होती.त्याप्रमाणे शासनाकडून मोफत तांदूळ देण्यात आला.यावेळी सुधीर गवारे,सोपानराव गवारे आदी उपस्थित होते.