सोनई 14 दिवसासाठी हॉट स्पॉट जाहीर ; नामदार गडाखांनी जनतेला काळजी घेण्याचे केले आवाहन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
सोनई (दादा दरंदले) सोनई गावात 10 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉट स्पॉट घोषित करण्यात आले आहे . गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहे.  नामदार शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाय योजनेची माहिती घेतली असून सर्व संबधित अधिकाऱ्यां समवेत चर्चा केली आहे.

             तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनई येथे आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केल्याने 22 लोकांपैकी 10 लोकांना कोरोनाची लागण झाल्याने तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात येऊन उपाय योजना चालू केल्या. आणखी हाय रिस्क असलेल्या असलेल्या सुमारे 50 लोकांची श्राव चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे.

               शुक्रवार (दि 10 जुलै ) रोजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली .यावेळी तहसीलदार सुराणा , तालुका आरोग्य अधिकारी सूर्यवंशी , शेवगाव पोलीस विभागाचे उप विभागीय अधिकारी मंदार जवळे , सोनई पोलीस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्धन सोनवणे उपस्थित होते . तालुक्यातील जनतेला आवाहन करतांना नामदार गडाख यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी सोनईत एका व्यक्तीचे दुर्दवी निधन झाले असून सर्वांनी काळजी घ्यावी व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. सोनईत हॉट स्पॉट घोषित केल्याने सर्व दुकाने बंद राहणार आहे . याकाळात अत्यावश्यक सुविधा बाबत कशा प्रकारच्या उपाय योजना करणार आहे , कोरोना बाधित लोकांच्या कोण कोण संपर्कात आले आहे , किती लोकांच्या टेस्ट करणार आहे अशा विविध बाबीवर नामदार गडाख यांनी आधीकाऱ्यांशी चर्चा केली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post