साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
शिरसगाव (वार्ताहर ) पवित्र मारीयेच्या सन्मानार्थ व प्रभू येशू यांच्या सन्मानार्थ आज एकत्र आलो आहोत. कोरोना महामारीसारख्या समस्याला तोंड देत आहोत.भविष्य कधी स्थिर नाही. त्यापेक्षा आपले आरोग्य कसे राहील याकडे लक्ष द्यावे. प्रभू येशू जो आपल्याला तारणारा आहे. तो म्हणतो माझ्याकडे या मी तुम्हाला बरे करेन,माझ्या सांगितलेल्या संदेशाचे मनन चिंतन करा,शांती मिळवण्याचा प्रयत्न करा,त्याच्या सानिध्यात राहून शांती आणि प्रेम व आनंदाचा उपभोग घ्यावा.दयेची माता,पवित्र माता ही रोग्यांचे औषध आहे.म्हणून आरोग्य देणारी माता आहे.सर्व रोगातून मुक्त करणारी माता आहे.वैचारिक आरोग्यासाठी आपले विचार बदलले पाहिजेत.आपल्याबरोबर दुसऱ्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे.क्षमा मागितली पाहिजे व दिली पाहिजे.आपल्या जीवनात दररोज रोझरीची प्रार्थना महत्वाची आहे.की जी कोरोना आजारातून मुक्त करेल, असा उपदेश रे फा गिल्बर्ट डेनिस यांनी केला.
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे आज दिनांक ११ जुलाई रोजी फक्त धर्मगुरु समवेत शासकीय आदेश पाळून मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा दुसरा शनिवार भक्तिभावाने संपन्न झाला. त्यावेळी रे फा गिल्बर्ट डेनिस यांनी धार्मिक प्रवचन केले. या नोव्हेनाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण यु ट्यूब व्दारे घरबसल्या भाविकांनी पाहिले. व मत माउली दर्शनाचा लाभ घेतला.सर्वांनी मतमाउली यात्रा महोत्सव २०२० सबस्क्राइब करून नोव्हेना प्रक्षेपण पाहावे.आजच्या मिस्सामध्ये जे कोणी आजारी आहेत,निराश आदी आहेत कोरोना व्हायरस पसरत आहे त्यांतील रुग्ण त्यांचेसाठी प्रार्थना करण्यात आली.आजच्या नोव्हेनामध्ये रे फा पायस,डॉमनिक,रिचर्ड,आदी सहभागी झाले होते.