श्रीरामपूरातील दोन मोबाईल चोरांना सापळा लावून पकडले ; मोबाईलसह विना क्रमांकाची मोटारसायकल जप्त


साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020

उक्कलगाव | प्रतिनिधी | पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार श्रीरामपूर बसस्थानक परिसरात सापळा लावून श्रीरामपूरातील दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची प्लॅटिना मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आला आहे. या मोटारसायकलचा पोलीस तपास करत आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या दोन गुन्हेगारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. 


              7 जुलै रोजी फिर्यादी सुहास बाबुराव फुलपगार (रा. उक्कलगाव तालुका श्रीरामपूर)  यांच्या शर्टचे खिशातून 21 हजार रुपये  किमंतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन एका विनानंबर प्लॅटिना गाडीवरून येऊन दोन इसमांनी बळजबरीने हिसकावून नेला यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 1103/2020 भा.दं.वि. कलम 392/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल व बारकार्ईने तपास केला असता श्रीरामपूर शहरातील सराईत गुन्हेगार शाहरुख अफसर शेख (रा. वाॅर्ड नंबर 6 श्रीरामपूर ) व त्याचा साथीदार बाबर जानमहमंद शेख (रा.वाॅर्ड नंबर 2 श्रीरामपूर) यांच्याकडे  चोरीची मोटारसायकल आहे व ते बसस्टॅन्ड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने डी बी पथकाचे पो हे काॅ जे के लोंढे, पो काॅ अर्जून पोकळे, पो काॅ पंकज गोसावी, पो काॅ सुनिल दिघे, पो काॅ किशोर जाधव, पो काॅ गणेश गावडे, पो काॅ महेंद्र पवार यांच्या पथकाने बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून मुख्य आरोपी  दोघांना ताब्यात घेतले. 

           त्यांच्याकडे मोबाईल बाबत व मिळून आलेल्या प्लॅटिना मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ते चोरीचे असल्याबाबत कबुली दिली. त्यांच्याकडुन गुन्ह्यातील 21 हजारचा रू किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन,या गुन्ह्यात वापरलेली 25 हजार रू किंमतीची एक विना नंबरची प्लॅटिना मोटारसायकल असा 46 हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन सदरची मोटारसायकल बाबतच अधिक पोलीस तपास करत आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक  अखिलेश कुमार सिंह,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर डाॅ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने,श्रीरामपूर विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नी.श्रीहरि बहिरट यांचेसह सपोनि समाधान पाटील, तपास पथकाचे पो काॅ जे के लोंढे,पो काॅ.पंकज गोसावी, पो काॅ किशोर जाधव, पो काॅ अर्जून पोकळे,  सुनिल दिघे महेंद्र पवार गणेश गावडे अंबादास आंधळे यांनी कारवाई केली आहे.

सराईत गुन्हेगारवर यापुर्वीचे दाखल गुन्हे.... 

आरोपी - शाहरुख अफसर शेख ( रा वॉर्ड नंबर 6)  खालील दाखल गुन्हे

श्रीरामपूर शहर पो ठाण्यात गुं. रं.नं. 18/2015 भादंवि कलम 392/34,प्रमाणे,गु.र.नं. 31/ 2016 भादंवि कलम 392 प्रमाणे, गु. र.नंबर 73/2015भादंवि कलम,379/ 34 प्रमाणे, गु र नंबर 297/2015 भादंवि कलम 394/ 34 प्रमाणे गु.र.नंबर 78/2018 भादंवि कलम 379 प्रमाणे श्रीरामपुर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

आरोपी - बाबर जानमंहमद शेख (रा. वाॅर्ड नंबर 2, श्रीरामपूर )
श्रीरामपूर शहर पो ठाण्यात दाखल गुन्हे...
गु.रनं 110/2009 भादंवि कलम 392/ 340 प्रमाणे, गु र नंबर 73/2015 भादं वि कलम, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post