साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जुलै 2020
श्रीरामपूर | शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस श्रीरामपूर शिवसेनेतर्फे अनेक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. इंदिरानगर परिसरात वड, पिंपळ यासारख्या निसर्गोपयोगी तीस वृक्षांचे वृक्षारोपण करून वृक्षसंगोपनाची जबाबदारीही शिवसेनेतर्फे स्वीकारण्यात आली आहे.
पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना, स्वखर्चातून 5 हजार आयुर्वेदिक किट्स लोकांना मोफत वाटणारे शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ.महेश क्षीरसागर यांचा 'कोव्हिड योद्धा' म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, शिवसेना जिल्हा संघटक डॉ.महेश क्षीरसागर, उमेश पवार, युवासेना शहर प्रमुख निखिल पवार, शुभम ताके ,गणेश गवारे, अकाश मैड ,राहुल भाऊ भोसले, स्वपनिल इंगळे, वृषीकेश इंगळे, देविदास सोनवणे, सुर्या सकट, शुभम आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.महेश क्षीरसागर यांचा सत्कार करताना कामगार नेते नागेशभाई सावंत, आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख तीलक डुंगरवाल, मराठा महासंघाचे राजेंद्र भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक यासीन बाबा सय्यद आदी उपस्थित होते.