अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी; आपची मागणी

अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपच्या वतीने पाठवण्यात आले आहे. 
_________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जुलै 2020
श्रीरामपूर ( अहमदनगर ) अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग या घटनात्मक आयोगाकडून करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सोमवारी (दि.27) श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. 

              निवेदनात पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या घटनात्मक संस्थेच्या माध्यमातून विविध पदांच्या भरत्या शासन दरबारी दरवर्षी होत असतात. या भरती प्रकियेतून अनेक राजपत्रित पद भरली जातात. जसे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, राज्यउत्पादन शुल्क यासारखे जबाबदार पद या आयोगाने निश्चित केलेल्या परीक्षांच्या माध्यमातून भरले जातात. दरवर्षी हे आयोग अनेक विभागातल्या वेगळ्या रिक्त पदांसाठी परीक्षा घेत असते त्यातून रिक्त पदी हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमत असते. यामुळेच या आयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा आदराचा व अपेक्षेचा आहे.

           याचबरोबर अराजपत्रित गटातील सर्व सरकारी नोकर भरती ही या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हावी,  याकरता आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली. निवेदनात डुंगरवाल यांनी असे म्हटले आहे की आपण 'महापोर्टल बंद' करुन  विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली, आता पुन्हा अशाच कोणत्या खाजगी कंपनी द्वारे चालवल्या जाणाऱ्या नवीन पोर्टल द्वारे ही भरती प्रक्रिया न करता, एमपीएससी द्वारेच ही भरती प्रक्रिया व्हावी, अशी रास्त मागणी विद्यार्थी करत आहेत. आपल्या सरकारने एमपीएससीला विचारणा केली असता एमपीएससीने देखील भरती प्रक्रिया घेण्याबाबत तयारी देखील दर्शवलीआहे. आता प्रशासन स्तरावर पुढील निर्णय घेऊन एमपीएससीला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना हिरवा कंदील दाखवने हे आपल्या हातात असल्याचे सांगितले.

               यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे,राहुल रणपिसे, प्रवीण जमधडे, प्रताप राठोड,किशोर वाडिले राहुल केदार ,श्रीधर  कराळे,आदित्य पठारे, दिनेश यादव, यशवंत जेठे, गौतम राऊत, राज मोहम्मद शेख, दीपक परदेशी, सचिन आजगे आदी उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post