साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जुलै 2020
श्रीरामपूर | अयोध्येतील 'श्रीराम मंदिर' निर्माणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्रखंडातून व गावातून विविध मंदिराची पवित्र माती व जल एकत्रित करुन, श्रीरामपूरातील ग्रामदैवत 'श्रीराम मंदिर' येथून मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करुन अयोध्येस रवाना करण्यात आले.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून भव्य राम मंदिरासाठी लढा चालू होता. त्या संघर्षाच्या सुवर्णक्षण म्हणून येत्या ५ ऑगस्ट २०२० रोजीच्या शुभमूहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराच्या एैतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मंदिर भूमिपूजनाकरीता देश भरातून विविध मंदिराची पवित्र माती व नद्यांचे जल अयोध्यास मागविण्यात आले आहे. त्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रत्येक प्रखंडातून व गावातून श्रीरामपूरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे विविध मंदिराची पवित्र माती व जल एकत्रित करुन मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करुन अयोध्येस रवाना करण्यात आले. यावेळी श्री. रुपेश हरकल व योगेश ओझा यांनी सर्व हिंदू बांधवांना व श्रीराम भक्तांना आवाहन केले की, ५ ऑगस्ट रोजी दु. १२.१५ वाजता श्रीरामाचे गावोगावी प्रतिमेचे पूजन करुन व महाआरती करुन जल्लोष साजरा करावे तसेच सर्व राम भक्तांनी करोनाचीही काळजी घेऊन सामाजिक अंतर ठेऊन, मास्कचा वापर करावा.
याप्रसंगी प्रांत सहमंत्री श्री. विश्वनाथ नानेकर (सर), जिल्हा मंत्री, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट महाराज, जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, बजरंग दलाचे रुपेश हरकल, प्रखंड मंत्री योगेश ओझा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हरदास, गुरुद्वाराचे प्रमुख श्री. जसपालसिंह सहाणी, श्रीराम मंदिर ट्रस्टचे चेअरमन श्री.मधुकर झिरंगे, श्री.अशोक शिंपी सर, रुद्र प्रताप कुलकणी, सिद्धार्थ सोनवणे, जय लबडे, रोहित भोसले, सौरभ चव्हाण, किरण राऊत, तसेच श्रीराम भक्त व कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती विश्व हिंदू परिषदचे प्रखंड मंत्री योगेश ओझा, व शहराध्यक्ष प्रसाद बिल्दीकर यांनी दिली.
शहरातील राम मंदिर, जैन मंदिर, गुरुद्वारा, जय मातादी मंदिर, काळा राम मंदिर, हनुमान मंदिर, साई मंदिर, गोंधवणीचे महादेव मंदिर, केशव गोविंद बन, व सरालाबेट येथे जाऊन पदाधिकार्यांनी महंत रामगिरी महाराजांचे भेट घेऊन माहिती दिली. बेटावरील पवित्र माती व जलपुजन करुन रवाना करण्यात आले. त्याप्रसंगी महंत रामगिरी महाराजांनी मंदिर भूमिपूजन व निर्माण कार्यासाठी शुभेच्छा देऊन संस्थानाची आध्यात्मीक शक्ती व सदिच्छा आपल्या सर्वांच्या पाठिशी राहतील असे सांगून आनंद व्यक्त केला. पवित्र माती व जल यांचे पुजन श्रीराम मंदिराचे पुजारी श्री. वाडेकर गुरु यांनी विधीवत पूर्ण केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पूर्ण वातावरण होते.