साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त शिवसेना उपतालुका प्रमुख नेवासा पंकज लांभाते यांनी घोडेगाव येथे सर्वत्र जंतुनाशक फवारणी केली.
सोमवार 27 जुलै रोजी सकाळी दहा वाजता घोडेगाव येथील शनी चौकात सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या हस्ते निर्जंतुकीकरण फवारणी मशीन चे नारळ वाढवून उद्घाटन केले. त्यानंतर घोडेगाव चौफुला बसस्टँड, मेन पेठ मारुती नगर, कृष्ण नगर व इतर परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जंतूनाशक फवारणी केली.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख पंकज लांभाते, घोडेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप येळवंडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप काळे, राजेंद्र येळवंडे, अली भाई शेख, कल्याण ईखे, संतोष लाटे, संदीप चेमटे, घोडेगाव येथील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्वांनी फिजिकल डिस्टनं ठेवत प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले.