साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जुलै 2020
घोडेगाव | प्रतिनिधी | नेवासा तालुक्यातील व नगर औरंगाबाद महामार्ग वरील घोडेगाव येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव बंद या बाबतचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती यांच्या वतीने घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला देण्यात आले.
कोरोना दक्षता कमिटीने घेतलेले निर्णय काही अंशी योग्य असले तरी छोट्या व हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांसाठी अन्यायकारक आहेत ,त्यामुळे ठराविक व्यवसाईकांनावर अन्याय न करता सरसकट घोडेगाव १४ दिवस लॉकडाऊन करावे अशी मागणी भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष रवी आल्हाट यांनी निवेदना द्वारे केली आहे.
सोनई गावात १० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर ,सोनई गाव कडकडीत बंद झाले ,घोडेगाव सोनई हे अंतर अगदी जवळ आहे ,कोरोनाचा प्रादुर्भाव गावात होऊ नये म्हणून सरपंच राजेंद्र देसरडा यांच्या अध्यक्षते खाली असलेली कोरोना दक्षता कमिटीने गावात अनेक निर्णय घेतले यात ,बस स्टँड परिसरात दररोज भरणाऱ्या फळे ,भाजीपाला बाजार बंद करण्यात आला ,त्यामुळे या व्यवसाईकांनावर उपासमारीची वेळ आली असून जर बाहेर गावातून येणारे लोक भाजीपाला खरेदीसाठी गावात थांबून जर कोरोना प्रसार वाढू शकतो तर गावात रोडवर असलेले ,किराणा दुकान ,मिठाई विक्री दुकाने ,जनरल स्टोअर्स ,स्टेशनरी दुकाने सर्रास सुरू असतात या ठिकाणी बाहेरील अनेक लोक खरेदी साठी जातात परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाही होत नाही किंवा त्यांना कुठलेही निर्बंध नाही ,यामुळे ठराविक व्यवसाईकांनावर अन्याय न करता पूर्णतः गावातील सर्व दुकाने पुढील १४ दिवस बंद ठेऊन कडक लॉकडाऊन करावे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समिती चे जिल्हाकार्याध्यक्षा प्रशांत लोंढे व भ्रष्टाचार निर्मुलन चे तालुका कार्याध्यक्ष रवी आल्हाट यांनी सरपंच ,ग्रामसेवक यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे .
गोरगरीब व्यावसायिकांचे व्यवसाय बंद करून ,मोठ्या व्यापाऱ्यांना पूर्ण सवलत दिली आहे ,कोरोना कमिटीचे घेतलेले बरेच निर्णय एकतर्फी आहेत ,आमच्या वरील मागण्यांचा सर्वांगाने विचार न झाल्यास मी स्वतः छोट्या व्यावसायिकांसाठी ग्रामपंचायत समोर उपोषण करणार आहे .
--- रवी आल्हाट, कार्याध्यक्ष - भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती नेवासा .