साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 जुलै 2020
शिरसगाव ( वार्ताहर ) सालाबादप्रमाणे दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी रविवारी महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी हरिगाव मतमाउली यात्रा भरते. त्याआधी नऊ शनिवारी डोंगरासमोर नोव्हेना भरत असते. ४ जुलै रोजी पहिला शनिवार असून व सध्या ३१ जुलैपर्यंत कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन घोषित झाल्याने पहिल्या शनिवारी होणारा नोव्हेना शासन आदेशाप्रमाणे सार्वजनिक घेऊ शकत नाही; परंतु, हरिगाव चर्च व्यवस्थापनाने थेट प्रक्षेपण करून भाविकांना पवित्र मारीयेचे मतमाउलीचे दर्शन घडवून आणावे, असे ठरवले आहे.
येत्या शनिवारी नोव्हेनाचा पहिला शनिवार असल्याने त्याचे पवित्र मिस्सा बलिदान व भक्ती यु ट्युबवर लाइव थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा ज्या कोणाला पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करावयाचे आहे तर त्यांनी ९६७३५४१५०५ या मोबाईलवर संपर्क साधावा किंवा चर्च कार्यालयात संपर्क साधावा. ज्या कोणाच्या वैयक्तिक प्रार्थना असतील त्या वरील फोनवर सांगू शकता व त्या ऐकण्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपल्या सर्वांच्या मनोकामना त्या पवित्र मतमाउलीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही सदोदित आपणासाठी प्रार्थना करीत आहोत. येणाऱ्या काळामध्ये देखील आपण अशी विशेष प्रार्थना करू या की जगावर या कोरोना विषाणूमुळे महासंकट आले आहे त्याचेवर मात करणेसाठी संपूर्ण जगातील लोकांना हातभार लागावा त्यामध्ये सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत व या जगाला कोरोना विषाणू संकटापासून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करणार आहोत.त्याचप्रमाणे जे आपले संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत ते यावर औषधोपचार शोधण्यासाठी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत त्यांचेही कामाला यश लाभो म्हणून मतमाउलीकडे प्रार्थना करू या.तसेच या वर्षी २ सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रा उद्घाटन सोहळा व्हायला पाहिजे व ३ सप्टे.पासून नऊ दिवसाच्या नोव्हेनाला सुरुवात करीत आहोत.व १२ व १३ सप्टे.रोजी आपण यावर्षी मतमाउलीचा यात्रा महोत्सव साजरा करायला हवा होता पण या संकटामुळे जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत काहीही नियोजन करू शकत नाही असे संत तेरेजा चर्च हरिगाव व्यवस्थापनाच्या वतीने प्रमुख धर्मगुरू पायस रॉड्रीक्स यांनी सांगितले.