साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 जुलै 2020
श्रीरामपूर | येथील जिजामाता चौकात नुकत्याच सुरू झालेल्या शिवभोजन थाळी केंद्राला खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट दिली. शिवभोजन थाळीतील सर्व पदार्थ बघून समाधान व्यक्त केले.
या शिवभजन थाळीच्या संचालिका सौ.जयश्री विळस्कर व दिलीप विळस्कर यानी खासदार लोखंडे यांचा शाल व बुके देऊन सन्मान केला. याप्रसंगी भि.रा.खटोड कन्या विद्यालयचे चेअरमन अशोक उपाध्ये यांनी भोजन थाळी संदर्भात सविस्तर माहिती देऊन गरीब व गरजू लोकांसाठी आहार असणाऱ्या या योजनेची माहिती दिली. श्रीरामपूर शहरात शिवभोजन थाळी प्रथमच सुरु करण्यात आली.
खासदार लोखंडे यांनी संपूर्ण शिवभोजन थाळीचा स्वाद घेतला. सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या योजना प्रत्यक्षात उतरताना दिसत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र देवकर, पत्रकार प्रकाश कुलथे ,सुधीर वायखिंडे,सुनील कपिले, संजय यादव, अतुल शेटे ,अक्षय गायकवाड, कैलास जगदाळे आदी उपस्थित होते.