साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 जुलै 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसिलदार प्रशांत पाटील यांना विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई स्थित दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थानाची नासधूस करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे कि, राजगृह ही वास्तू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी उभारली होती. परिवर्तनवादी चळवळीसाठी 'राजगृह' हे सांस्कृतिक अस्मितेची निशाणी आहे. देशाचे संविधान लिहिणाऱ्या व्यक्तीचे निवासस्थान देशासाठी आदरणीय आहे. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. संध्याकाळच्या सुमारास काही मनुवादी माथेफिरुंनी हा प्रकार केला आहे. यात त्यांनी घराबाहेरील सी.सी.टी.व्हीचेही मोठे नुकसान केले आहे. झालेली घटना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या साठी निंदनीय आहे. आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करून आरोपी कोण आहेत त्यांचा असे कृत्य करण्यामागे उद्देश काय? हे देशाला समजले पाहिजे. या घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करण्यात येऊन सखोल चौकशी करून सत्यता जनतेसमोर जाहीर करावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन आंबेडकरी प्रेमीच्या वतीने छेडण्यात येईल.
निवेदनावर ब.स.पा. चे तालुकाध्यक्ष प्रकाश अहिरे, प्रभारी तैयब शेख, पत्रकार संजय जाधव, कैलास राहिंज, एड. जी. बी. अमोलिक, दिनेश अहिरे, किशोर ठोंबरे, महेश मोरे, हर्शल शेळके यांच्या सह्या आहेत.