साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जुलै 2020
शिरसगाव (वार्ताहर ) श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव मतमाउली भक्तिस्थान संत तेरेजा चर्च हरिगाव येथे मतंमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा तिसरा शनिवार भक्तिभावाने शासकीय आदेश पळून संपन्न झाला. नोव्हेनाचे थेट प्रक्षेपण भाविकांना घरबसल्या पहावयास मिळाले.
ज्ञानमाता चर्च नेवासा,पवित्र आत्म्याचे चर्च शेवगाव,संत फ्रान्सिस झेवियर चर्च मनमाड,येथील येथील व हरिगाव, बेलपिंपळगाव,पाचेगाव येथील भाविकांसाठी प्रार्थना करण्यात आलीआजच्या नोव्हेनाप्रसंगी श्रीरामपूर लोयोला सदन चे रे फा ज्यो गायकवाड यांनी प्रवचन केले. दु:खीतांचे समाधान करणारी पवित्र मारिया अशा विषयावर त्यांनी प्रतिपादन केले की.जे तिच्याकडे विश्वासाने जातात आपल्या मागण्या नवस करतात ती पूर्ण करते.दु:ख दूर करते.आदी महिमा वर्णन केला.या नोव्हेनाप्रसंगी संत तेरेजा चर्च रे.फा पायस रॉड्रीक्स, डॉमनिक रोझारीओ, रिचर्ड अंतोनी,सहभागी झाले होते.