बेलापूरकरांनो सावधान...... नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई

साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 जुलै 2020
बेलापूर  ( प्रतिनिधी ) बेलापूर पोलीसांनी विनामास्क फिरणारे तसेच विनाकारण फिरणारे यांना आपला खाक्या दाखविण्यास सुरुवात केली असून शनिवारी (दि.18) दोन जणावर कारवाई करण्यात आली तर काहींना जागेवरच शिक्षा देण्यात आली.     

               बेलापूरात कोरोनाचा रुग्ण सापडताच ग्रामस्थांनी कडक धोरण अवलंबविले विना मास्क फिरणाराला दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते रुग्ण घरी आल्यामुळे गावात सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने रस्त्यावर येवु लागले. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन जमु लागले. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस उपनिरीक्षक डी बी  उजे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, साईनाथ राशिनकर, निखिल तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त घालुन खुलेआम विनाकारण करणारांना चांगलेच फटकारले विनामास्क टिबल सीट मोटार सायकलवर जाणाऱ्यांना  चौकातच उठबशा काढावयास लावल्या. त्यांनतर गावात अनेकांना दंडूक्याचा प्रसाद दिला. सुनिल वैद्य हा विनाकारण  फिरताना आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीसा काँन्स्टेबल निखील तमनर यांनी दिली तर पोलीस काँन्स्टेबल पोपट भोइटे यांच्या तक्रारी वरुन एकलहरे येथील विशाल अल्हाट याचे विरुध्द  जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा आदेशाचे  नियमाचे उल्लघन केल्याबद्दल दोघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांच्या या कारवाई मुळे मोकाट फिरणार्यांना आळा बसेल हे नक्कीच... 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post