साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जुलै 2020
बेलापूर (प्रतिनिधी) बेलापूरातील आणखी एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे शासकीय नियमानुसार २०० मिटरचा भाग पुर्णपणे बंद करण्यात आला. दरम्यान, या व्यक्तीची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. आरोग्य यंत्रणेने आता त्यास होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळाची नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
बेलापूरातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन तब्बल बारा दिवसापूर्वी संबधीत रुग्णाचा स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आल्यामुळे संपूर्ण परिसर सिल करण्यात आला आहे. दरम्यान, या व्यक्तीची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्याने सारा गोंधळ उडाला आहे. संबधीत व्यक्ती कोरोंटाईन असताना त्याचा स्वँब घेवुन त्यास सोडून देण्यात आले होते. त्या नंतर ती व्यक्ती गावात येवुन सर्वत्र खुली आम फिरत होती. त्यामुळे गावात रुग्ण वाढल्यास त्यास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुनिल मुथा यांनी केला असुन त्या व्यक्तीचा अहवाल येण्यास बारा दिवसाचा कालावधी का लागला त्यास अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करणे आवश्यक असताना त्यास कुणाच्या आदेशाने सोडले?? त्याच्या हातावर शिक्का का मारला नाही?? असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे. या बाबत कुणावर कारवाई करणार असा सवाल मुथा यांनी केला असुन या प्रकारामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. प्रशासनाच्या चुकीचा परिणाम बेलापूराकरांना भोगावा लागत असुन बारा दिवासाच्या कालावधी नंतर अहवाल का आला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विवेक वाबळे यांनी केली आहे.