सँनिटायझरची किराणा दुकानातुन विक्री कारवाईची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 जुलै 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) सँनिटायझरची विक्री ही मान्यता प्राप्त परवाना धारकाकडून होणे अपेक्षित असताना सर्वत्र खुले आम सँनिटायझरची विक्री होत असुन विनापरवाना विक्री करणारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

           सँनिटायझर  हे औषधी प्रवर्गात मोडत असल्या कारणाने त्याची विक्री ही मान्यता प्राप्त औषध विक्रेत्या परवाना धारकाकडूनच केली जावी असा कायदा असतानाही सँनिटायझर हे अनेक किराणा दुकान व इतर व्यवसायीक खूले आम विक्री करताना दिसत आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायादा १९४० ३ बी नुसार सँनिटायझर हे औषधी प्रवर्गात मोडत असुन त्याची विक्री परवाना धारका शिवाय  इतरांना करता येणार नाही, असे असतानाही किराणा दुकानदार जनरल स्टोअर्स व इतर व्यवसायीका कडून सँनिटायझरची खूलेआम विक्री सुरु आहे. या बाबत अन्न व औषध विभागाचे सहा आयुक्त एस बी पाटील यांनी काढलेल्या पत्रकानुसार फक्त अधिकृत परवाना धारकांनाच सँनिटायझरची विक्री करता येणार आहे त्यामुळे इतर ठिकाणी सँनिटायझर विकणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी औषध विक्रेत्यांनी केली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post