गरीब नवाज फाउंडेशनच्या वतीने सफाई कामगारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
श्रीरामपूर | गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक मुख्तारभाई शहा यांच्यावतीने पालिकेत नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी भाऊसाहेब ढेरे यांच्या हस्ते प्रभाग क्र. २ मधील कार्यरत सर्व सफाई कामगारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सॅनीटायझरचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी अहमदभाई जहागिरदार, कामगार युनियनचे कॉ. जीवन सुरूडे, आरोग्य अधिकारी संजय आरणे, मुन्ना पठाण, पालिकेचे श्री. जाधव, सुपरवायझर राहुल दाभाडे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.

             यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी भाऊसाहेब ढेरे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सफाई कामगार कोरोना योद्धा म्हणून चांगल्या रीतीने कामकाज करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जगभरात महामारी पसरली आहे मात्र आपण त्यापासून घाबरून न जाता धिराने या संकटाला तोंड दिले पाहिजे. सर्वसामान्या नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रचंड भिती आहे. ती घालविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांमध्ये जागृती घडवून आपण कोरोनाला हरवू शकतो. ते काम आपण जबाबदारीने करावे. सफाई कर्मचारी आपली जबाबदारी व्यवस्थीत हाताळीत आहेत. त्यामुळेच या महामारीच्या काळातही शहराचे आरोग्य सुस्थितीत आहेत. नागरिकांनीही आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ढरे याांनी केले. यावेळी नगरसेवक मुुुख्तारभाई शहा, अहमदभाई जहागिरदार, कॉ. जीवन सुरूडे आदींची भाषणे झाली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post