बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा फडशा ; नागरीक भयभीत, वनविभाग पिंजरे लावल का??

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020   
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सोमनाथ बाळासाहेब थोरात यांच्या वस्तीवर, बिबट्याने जाळीत बांधलेल्या शेळीवर झडप घालून नजीकच्या उसात शेळीला फडफडत नेत शेळीचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास  घडली. या परिसरात कायमच बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली असतात. या ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत,अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

               प्रवरानदीपात्र परिसरातील गावात बिबट्याच्या वारंवार घडत असणार्‍या घटनेने येथील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव शिवारात दवणगाव फाटा कोल्हार रस्ता शिवारातील बिबट्याने परिसरात चांगलाच धुमाकुळ घातला आहे. बिबटयाच्या संचाराने येथील स्थानिक लोक चांगलेच भयभीत झाले आहेत. परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यावेळीच बिबटयाने थोरात वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला. अनेक दिवसांपासून प्रवरा नदीपात्र परीसर गोदावरी नदीपात्र नजीकच्या परिसरात बिबट्याचा कायमच वावर असल्याने येथील लोक धास्तावले आहे. सोमनाथ थोरात यांनी वनधिकार्‍यांना  घडलेल्या घटनेची माहिती दिली,असता वनसंरक्षक विकास पवार वनपाल मदतनीस दौंड यांनी घटनास्थळी दाखल घेऊन सदरच्या बिबटयाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीचा पंचनामा केला. परिसरात वनधिकाऱ्यांच्या तातडीने नवीन पिंजरे लावण्यात यावेत येथील शेतकऱ्यांनी वनधिकाऱ्याकडे केली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post