साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 जुलै 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरात समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या इनरव्हिल क्लब आॅफ श्रीरामपूरच्या नूतन अध्यक्षा श्रीमती सुजातादिदी शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेस एक हॅंड अॅटो सॅनेटायझर डिस्पेंन्सर मशीन भेट दिले.
श्रीरामपूर नगरपरिषदेत नागरिकांची कामानिमित्त सतत वर्दळ असते. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता या मशिनमुळे नागरिकांना व कर्मचार्यांना चांगली सोय उपलब्ध झालेली आहे. इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सुजातादिदी शेडगे,सचिव सौ दिप्ती दहिमीवाल,सौ ममता गुप्ता,सौ प्रिया अग्रवाल यांचे हस्ते नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यापूर्वी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी देखील श्रीरामपूर नगरपरिषदेस कर्मचारी व नागरिकांसाठी दोन सॅनिटायझर स्टँड दिले होते.