गुरु पौर्णिमा निमित्त श्री रेणुका देवी महापूजा करण्यात आली.
साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जुलै 2020
वडाळा महादेव | कोराना प्रार्दुभावामुळे अंत्यत साध्या पध्दतीने व मोजक्या ऊपस्थितीत आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून येथील रेणुका आश्रमात आनलाईन गुरू पौर्णिमा ऊत्सव करण्यात आला.
प्रारंभी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका देवी महापूजा व आरती यजमान सौ व श्री महेश भणगे यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर व्यासपीठ पूजन,सदगुरु पादुका पूजन करण्यात आले. सदगुरु रेवणनाथ महाराज यांनी आश्रमाच्या फेसबुक वरून लाईव्ह आशीर्वाद दिले. आपल्या ऊपदेशात त्यांनी कोरोना संकटातून बाहेर येण्यासाठी आपल्या घरीच जप.तप,अनुष्ठान व प्रार्थना करावी, असे आवाहन केले. सदगुरुचे जीवनातील स्थान व महत्त्व त्यांनी आपल्या ऊपदेशात अधोरेखित केले. आरतीने ऊत्सव सांगता झाली.
या वेळी सोशल डिस्टसिंग नियम पालन करण्यात आले,या ऊत्सवात घ्वजसेवा श्री संदिप कुलकर्णी व श्री शिंपी परिवार यांनी दिली,तांबुल प्रसाद सेवा वैभव गायकवाड तर पेढा प्रसाद सेवा एस. एम. कमलापूरकर यांनी दिली. आँनलाईन ऊत्सव केल्याने घरात बसूनच देवीचे व सदगुरुंचे दर्शन झालेमुळे परगावचे भाविकांनी फोन करून संयोजन समितीस धन्यवाद दिले.