कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवस श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याची तहसीलदारांकडे मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 जुलै 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरात रोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. श्रीरामपूर ३० दिवसात द्विशतक ओलांडले आहे. त्यामुळे  7 दिवस शहर बंद ठेवावे, कोरोनाची साखळी तोडून गाव सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सात दिवसाचा कर्फ्यू घोषित करावा, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.  

         गावातील राजकारण व श्रेयवाद महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक पुढाऱ्याला गाव कोण चालवत आहे पेक्षा कोणालाही चालवून द्यायचे नाही अशी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. यात ऱ्हास मात्र फक्त गावाचा होत आहे.ज्या घरातील पेशंट सापडतो त्या संपूर्ण घराला व त्याच्या शेजाऱ्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो खूप भयावह असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सध्या एक नवीन विक्षिप्त विचार उदयास येत आहे. 'कोरोना सर्वांनाच होणार आहे, कोरोणामुळे काहीच होत नाही, कोरोणाला घाबरू नका', आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे शब्द चांगले आहे. परंतु, सरकारी यंत्रणेचा बडगा फक्त कोरोना झालेल्या कुटुंबावर व त्यांच्या शेजाऱ्यावरच पडत आहे. त्यांना असह्य त्रास होत आहे त्याची कोणालाही परवाह नाही. जर कोरोना सगळ्यांना होणार असेल तर त्या सर्वांना त्यांच्या परिवार व शेजाऱ्यांसह हा भयावह त्रास भोगावा लागणार आहे, असेही म्हंटले आहे.  

               सरकारी यंत्रणेकडून चुका होत आहे. पण सोबतच गावातील नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात चूका घडत आहे. गर्दी करणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, स्वतःची व समाजाची काळजी न घेणे अशा चुका सर्रास होत आहेत.  निदान आता तरी गावकऱ्यांनी काळजी घ्या तुम्ही ज्यांना मत देतात, ज्यांना तुम्ही गाव पुढारी समजतात त्यांना तुमच्या जीवाची अथवा तुम्हाला होणाऱ्या त्रासाची कुठलीही काळजी नाही. त्यांना काळजी आहे ती फक्त त्यांच्या श्रेयवादीत राजकारणाची कारण त्यांना माहित आहे भविष्यात पैसे देऊनच निवडून यायचा आहे असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गाव पुढाऱ्यांच्या भरवशावर न राहता  स्वतःची काळजी स्वतः घ्या. शहरातील व्यापाऱ्यांना कोरणा पेक्षा जास्त भीती आपल्या व्यवसायातील वळण बिघडू नये अशी आहे त्यांनीदेखील आपली स्वतःची, आपल्या दुकानात कार्यरत कर्मचाऱ्यांची व येणाऱ्या गिऱ्हाईकाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. परंतु, ती घेतली जात नाही. सात दिवस शहर बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडून गाव सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सात दिवसाचा कर्फ्यू घोषित करावा असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. त्यावर तहसीलदारांनी लवकरच निर्णय घेवू, असे सांगितले. या निवेदनावर हिंदू रक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय जैस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष लकी सेठी, नगरसेवक रवी पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, श्रीराम सेवा संघाचे संस्थापक कुणाल करंडे, सावरकर प्रतिष्ठानचे अमित मुथा,  बाबूराम शर्मा, नवीन गदिया आदींच्या सह्या आहेत. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post