ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या टिळकनगर, चितळी डिस्टिलरी मद्य कारखान्यांवर कारवाई करावी ; छावाचे प्रविण कोल्हे यांची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 जुलै 2020
श्रीरामपूर | ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या टिळकनगर, चितळी डिस्टिलरी मद्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी व मळी वाहतूक बंद करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे प्रविण कोल्हे पाटील यांनी केली आहे; कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. खान यांना निवेदन देण्यात आले आहे   

             निवेदनात पुढे कोल्हे यांनी म्हंटले आहे की, टिळकनगर डिस्टिलरी व चितळी जॉन डिस्टिलरी येथील मद्य कारखान्यातून दररोज लाखो लिटर मळी टँकरद्वारे ओव्हरलोंडींग करून शेतात व रस्त्याच्या कडेला सोडतात. त्या टाक्याही गळक्या असल्यामुळे रस्त्यावर माळी सांडून अपघात होऊन लोकं मरण पावलेले आहे यांस जबाबदार कोण?? असा सवाल कोल्हे यांनी विचारला आहे. कारखानदारांवर कारवाई कारवाई न करण्याचे कारण काय? कारखानदार शासनाचे जावई तर नाही ना? असा संतप्त सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या कारखानदारांडून काही चिरी मिरी तर मिळत नाही ना? असाही प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. कारखानदार सहा-सात तालुक्यात मळी ओव्हरलॉंडींग टँकर करून रस्त्याच्या कडेला शेतात टाकतात  या मळीत विषारी घातक द्रवे असतात हे द्रव्य शेतात जिरल्यामुळे जमीन नापीक होते. ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या टिळकनगर, चितळी डिस्टिलरी मद्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी व मळी वाहतूक बंद करावी, अन्यथा; मागणी छावा मराठा संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल,  असा इशारा प्रविण कोल्हे पाटील यांनी दिला आहे. 

                     

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post