साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 जुलै 2020
श्रीरामपूर | खुन प्रकरणातील दोघे संशयीत आरोपी बेड्यासह पोलिस व्हॅनमधुन पसार झाल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचारी निलंबित केल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक राहुल मदने यांनी दिली.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस प्रशासनाने केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सचिन काळे (रा. मुठेवाडगाव) व भौंदू भोसले (रा.कानडी,ता.आष्टी) हे दोघे न्यायालयीन कोडठीत असताना काल रात्री त्याचे पोट दुखु लागल्याने त्यांना उपचारासाठी पोलिस व्हॅनमध्ये ग्रामीण रुग्णालयात नेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिस व्हॅनचा मागील दरवाजा उघडुन धुम ठोकली. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस पथके तैनात केली असुन पोलिसांनी पाठलाग करुन भोसले याला सिरसगाव शिवारात बेडीसह पकडले. तर काळे याचा अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आज चौकशी दरम्यान, वरिष्ठ पोलिस प्रशानाने तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार मुन्सुर शेख, नंदकुमार भैलुमे, दत्तात्रय शिंदे, संजय घोरपडे यांना निलंबित केल्याची कारवाई केल्याची माहिती मदने यांनी दिली. दरम्यान, काळे यांने मुठेवाडगाव शिवारातुन रात्री एक दुचाकी पसार केली असुन औरंगाबाद येथील बिडकीन परिसरात आज सदर दुचाकी आढळली आहे. यापुर्वीही ग्रामीण रुग्णालयात परिसरातुन एक आरोपी पोलिसांची नजर चुकवुन पसार झाला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी त्याला गोंधवणी परिसरात पकडले होते. या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस प्रशासनाने आज तालुका पोलिस ठाण्यातील चार पोलिस हवालदार निलंबित केल्याची कारवाई केली आहे.